कोल्हापूर जिल्हा परिषदेचे महिला पथक शोभायात्रेत प्रथम…

कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूरच्या शाही दसऱ्यानिमित्त ललित पंचमीच्या दिवशी महिलांची शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. या शोभा यात्रेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद महिला पथकाने प्रथम क्रमांक पटकावला.

कामकाजी महिला आणि इतर महिला समूह अशा दोन गटांमध्ये महिलांचा सहभाग नोंदवण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या 22 महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या शोभायात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवला या शोभा यात्रेकरिता पारंपारिक वेशभूषेमध्ये आपल्या दुचाकीसह सहभागी व्हायचे होते याकरता तसेच प्रत्येक ग्रुपने एका संकल्पने च्या आधारे शोभायात्रेत सहभाग नोंदवायचा होता.

जिल्हा परिषदेच्या महिला अधिकारी व कर्मचारी यांनी बेटी बचाव बेटी पढाव या संकल्पनेवर आपल्या दुचाकी सजवल्या होत्या सर्व दुचाकीनवर बेटी बचाव बेटी पढाव या संकल्पनेचे छायाचित्र दर्शनी भागात लावण्यात आले होते तसेच प्रत्येक दुचाकी फुले पाने अशा पर्यावरण पूरक साहित्य वापरून सजविण्यात आली होती.

सर्व सहभागी महिलांनी पिवळा कुर्ता सलवार व निळे जॅकेट कोल्हापुरी चप्पल आणि गुलाबी फेटा असा पारंपारिक कोल्हापुरी पेहराव केला होता.

या स्पर्धेचे पुरस्कार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहिर केले असून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला पथकाला दहा हजार रुपयाचे प्रथम पारितोषिक घोषित करण्यात आले.

या शोभायात्रेत  सुषमा देसाई, श्रीमती मनीषा देसाई,  शिल्पा पाटील,  माधुरी परीट,  मीना शेडकर आणि  अरुणा हसबे या महिला अधिकारी यांनी सहभाग नोंदविला.   त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील  यांनी   अभिनंदन केले .