स्वाभिमानीच्या ऊस दर आंदोलनाला उग्र रूप…

शिरोळ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ४०० रूपयेच्या दुसर्या हप्त्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. गेल्या ७ दिवसापासून राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा सुरू आहे. तसेच ४०० रूपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता.

चिपरी ता. शिरोळ येथील घोडावत जॉगरी कारखान्याने उसाची पहिली उचल जाहीर न करताच ऊस तोड सुरू केली होती. आज संध्याकाळी निमशिरगाव येथून उसाची वाहतूक सुरू असताना संतप्त कार्यकर्त्यांनी उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिला.