पिझ्झाशिवाय पार्टीच नको ; असं म्हणणाऱ्यांसाठी हा खास लेख

पिझ्झा शिवाय पार्टीच नको म्हणताय? वाचा पिझ्झा खाल्ल्याने होणारं नुकसान कार्बोहायड्रेट्स साखरेचं प्रमाण खूप असतं. मधुमेह असणाऱ्यांनी चुकूनही पिझ्झा खाऊ नये.

पिझ्झा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेहाचा धोका निर्माण होतो.ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांनी पिझ्झा खाऊन कसं चालेल? कॅलरी जास्त असल्याने कंबरेची, पोटाची चरबी वाढू शकते. पिझ्झा खाल्लयाने वजन कधीच कमी होऊ शकत नाही. उलट वजन मेंटेन करायचं असेल तर पिझ्झा पासून दूर राहावं.

ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांनी पिझ्झा खाऊन कसं चालेल? कॅलरी जास्त असल्याने कंबरेची, पोटाची चरबी वाढू शकते. पिझ्झा खाल्लयाने वजन कधीच कमी होऊ शकत नाही. उलट वजन मेंटेन करायचं असेल तर पिझ्झा पासून दूर राहावं.

पिझ्झा मध्ये साखरेबरोबरच मिठाचे प्रमाण जास्त असते. मीठ आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. सोडियमचं प्रमाण जास्त झाल्यास आरोग्यास हानी पोहचते. सोडियम जास्त झाल्यास रक्तदाबाची तक्रार होऊ शकते.

रक्तदाब वाढला की हृदयविकाराचा झटका धोका वाढतो. पिझ्झा मध्ये मीठ जास्त असल्याने अर्थातच सोडियम जास्त असते, सोडियममुळे रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. हे टाळायचं असेल तर पिझ्झा खाणं टाळा.

पिझ्झा खाल्ल्याने पोट बिघडू शकते. पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकतात. बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाची तक्रार पिझ्झा खाल्ल्याने होऊ शकते.