सांगरूळ हायस्कूलच्या वतीने नवरातकरी भक्तांचे अभिनव पद्धतीने स्वागत

सांगरूळ : (ता. करवीर ) येथे दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .यावर्षी सांगरूळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगरूळ यांच्या .वतीने शाळा – गाव – ग्रामस्थ – विद्यार्थी यांची एकमेकांशी नाळ जोडणारा व सांस्कृतिक व सामाजिक परंपरा सुसंस्कार जपणारा एक अनोखा उपक्रम यशस्वीपणे राबविला . उपस्थित ज्योतिर्लिंग भक्तासह ग्रामस्थांमधून या उपक्रमाचे कौतुक होत आहे .
ग्रामदैवत जोतिर्लींग देवस्थानची मानाची सासनकाठीचे पूजन सांगरूळ शिक्षण संस्थेचे सचिव आमदार जयंत असगावकर यांच्या हस्ते केले .शाळेच्या प्रांगणात मानाची सासन काठी व सर्व नवरातकरी भक्तांचे विद्यार्थ्यांनी अतिशय जल्लोषात, दुतर्फा उभा राहून टाळ्यांच्या गजरात वाजत – गाजत व पुष्पवृष्टी करत स्वागत केले. महिला भक्तांच्यासाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते ..तसेच सर्व नवरात्रकरी स्त्री व पुरुषांना शाळेच्या वतीने ताक वाटप करण्यात आले .एकूणच सामाजिक बांधिलकी जोपासत शाळेने समाजाशी असलेले नाते अधिक घट्ट करण्याचा केलेल्या या अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थातून कौतुक होत आहे .
सांगरुळचे पश्चिम बाजूच्या जोतिबा डोंगरावर ग्रामदैवत श्री क्षेत्र जोतिबा देवालय आहे. या देवालयात शाही दसरा सणामध्ये गावातील चारशे ते पाचशे नागरिक नवरातन बसतात .घटस्थापनेपासून जागराच्या दिवसापर्यंत आपापल्या सोयीनुसार भक्त देवालयात येतात . एकदा देवालयात आले की खंडेनवमी पर्यंत देवालयातच मुक्काम करायचा असा येथील नियम आहे .खंडेनवमी दिवशी सर्व भक्त एकत्रितपणे पालखी व सासनकाठी सह नदीला स्नानासाठी जातात. या मार्गावरच ज्योतिबा देवालयाच्या पायथ्याशी सांगरूळ हायस्कूलची सुसज्ज इमारत आहे . या क्रीडांगणावरून जोतिबा देवालयाचा मार्ग आहे. आपल्या शाळेच्या क्रीडांगणावर ग्रामदैवत जोतिर्लीग भक्तांची सेवा करण्याची संधी मिळते अशी प्रेरणा घेऊन तसेच सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या हेतूने हा उपक्रम आम्ही राबवत असल्याचे प्राचार्य एस एम नाळे यांनी सांगितले .
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख लुकेश कोळी यांनी केले.

यावेळी सांगरुळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष य.ल. खाडे , सहसचिव  डी एन कुलकर्णी , संचालक  बी आर नाळे ,  आ गो कासोटे ,  डी जी खाडे सर , मदन पाटील साहेब, संचालिका श्रीमती इंदुबाई असगावकर   प्राचार्य श्री एस एम नाळे , उपप्राचार्य एन डी सुतार, पर्यवेक्षक  एस के पाटील  यांचे सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
🤙 9921334545