कोल्हापूर : जयसिंगपूर येथील जे.के.घोडावत कन्या महाविद्यालय, येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ झोनल तायक्वांदो स्पर्धेत विवेकानंद कॉलेजच्या विशाल दिलीप बराले (बी.ए.भाग 3) याने 89 किलो वजन गटाखालील स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले तर व कु. श्रेया विश्वास बराले (बी.ए.भाग 1) हिने 46 किलो वजन गटाखालील स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले.
या यशाबद्दल त्याचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ईओ. कौस्तुभ गावडे , विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
वरील दोन्ही खेळाडूना जिमखाना प्रमुख प्रा.हवलदार एन.आर.सणगर, प्रा सहिदा कच्छी, प्रा संतोष कुंडले, प्रा समिर पठाण , प्रशिक्षक विश्वास बराले यांचे बहुमोल मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
