कशी झाली ललित पाटील वर कारवाई ; पोलीस सहआयुक्तांनी केले खुलासे

पुणे::गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला अखेर अटक करण्यात आली. बुधवारी दुपारी त्याला अंधेरी कोर्टासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. त्यानंतर मुंबई पोलीसांतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत अनेक महत्वपूर्ण खुलासे केले. पाटीलला अटक कशी केली, पोलिस केव्हापासून त्याच्या मागावर होते, यासंदर्भात पोलीस सहआयुक्तांनी महत्वाची माहिती दिली.

ड्रग्ज रॅकेट प्रकरणात ललित फरार होता. अखेर काल रात्री साकीनाका पोलिसांनी बंगळुरूमध्ये त्याच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली. ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्याने ड्रग्स प्रकरणातील अनेक बड्या धेंडांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. सोमवापर्यंत त्याला पोलिस कोठडी ठोठावण्यात आल्याने त्याच्या चौकशीतून या ड्रॅग्स रॅकेट प्रकरणातील बरीच महत्वाची माहिती समोर येऊ शकते.

या गुन्ह्याचा तपास ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्यात आला होता. तेव्हा अन्वर सय्यद या पहिल्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. तेव्हा त्याच्याकडून १० ग्रॅम ड्रग्स जप्त करण्यात आले. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे आत्तापर्यंत १४ आरोपींना अटक करत सुमारे १५० किलो (एमडी) ड्रग आम्ही जप्त केले. त्याची किंमत अंदाजे ३०० कोटी रुपये होती, असे पोलिस सहआयुक्तांनी सांगितले.
न्यायालयाने त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. त्यानंतर मुंबई पोलीसांतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत अनेक महत्वपूर्ण खुलासे केले. पाटीलला अटक कशी केली, पोलिस केव्हापासून त्याच्या मागावर होते, यासंदर्भात पोलीस सहआयुक्तांनी महत्वाची माहिती दिली.

🤙 8080365706