कोण आहेत मीरा बोरवणकर?

पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘मॅडम कमिश्नर’ या पुस्तकामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पोलिसांच्या जमिनीचा हस्तांतरणाचा आदेश देण्यात आल्याचा गौफस्फोट करण्यात आला आहे.

मीरा बोरवणकनकर महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला IPS अधिकारी… ज्यांचं नाव केवळ राज्यातील सर्वोत्कृष्ट आयपीएस अधिकाऱ्यांमध्येच नव्हे तर देशभरात ‘सुपरकॉप’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांना ‘लेडी सिंघम’ असंही म्हणतात…. साल २०१०… ज्यावेळी पुण्याचे पालकमंत्री होते अजित पवार… तर पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी होत्या मीरा बोरवणकर. याच मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करण्यात आलेत. पुण्याचे पालकमंत्री होऊन आठवडा होत नाही तोच अजित पवार अडचणीत आल्याची चर्चा आहे.

🤙 9921334545