शिंदे समर्थकांनी केली नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई : राज्यात दंगली घडविण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना दिले होते, असा आरोप नितेश राणे यांनी मंगळवारी केला होता. या आरोपावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतप्त झाले आहेत.

माजी पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या पत्रकार परिषदेचा हवाला देत, भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या आमदारांवर गंभीर आरोप केला होता. त्यामुळे शिंदे समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून नितेश राणेंची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सत्तेत भाजप आपल्यासोबत असताना आपल्या मित्रपक्षाच्या आमदारांवर नितेश राणे कसे काय आरोप करू शकतात, असा प्रश्न करीत या आमदारांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडेच तक्रार केल्याचे समजते.

🤙 9921334545