कोल्हापूर : कोल्हापुरात पुन्हा एकदा लव्ह जिहाद प्रकरण घडले असून मनसेच्या वतीने लक्ष्मीपुरी पोलिसांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.फसव्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लव जिहादद्वारे हिंदू मुलीची फसवणूक करून आर के नगर कोल्हापूर येथे राहणाऱ्या एका मुस्लिम युवकाने प्रेमाचे नाटक करून हिंदू मुलीला लग्नाची आमिष दाखवून तिच्यावर सातत्याने लक्ष्मीपुरीतील लॉजवर नेऊन अत्याचार केला.
मात्र गेली सात ऑक्टोबर 2023 पासून तो गायब झालेला असून पिढीते सोबतचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन या पिढीतेला धमकवण्याचा प्रकार देखील होत असून आरोपीच्या भावांनी देखील तिला धमकी दिलेली असल्याने तिच्या जीविताला या प्रकरणी धोका निर्माण झालेला आहे.
भविष्यामध्ये अशा घटना रोखण्यासाठी आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी यासाठी राज ठाकरे यांच्याकडे मदतीची विनवणी करणाऱ्या या युवतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील, विभाग अध्यक्ष अतुल भालकर, प्रशांत माळी, अभिजीत पाटील , राहुल कुंभार , अरविंद कांबळे , निलेश आजगावकर , दिलीप पाटील, कृष्णात बाबर, सॅम मुधाळे, विक्रम नरके , शरद जाधव, पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांना निवेदन देऊन याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देण्यात आले.
लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी त्वरित पिढीतेचा जबाब घेऊन संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला व या आरोपीच्या शोधासाठी पथक त्वरित रवाना केले.