कराड : प्रस्थापित मराठे 70 वर्षे सत्तेवर होते, ते काय गांजा ओढत होते की गोट्या खेळत होते? त्यांनी का मराठ्यांना आरक्षण दिले नाही?देवेंद्र फडणवीसांना घेरण्यासाठी आरक्षणाची हत्यार वापरली जात असून त्यासाठीच मराठ्यांसह अनेक समाजाची आंदोलनं सुरू झाल्याचा आरोप रयत क्रांतीचे संस्थापक माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला.कराड (जि. सातारा) दौऱ्यावर असताना माध्यमांशी ते बोलत होते.
ते म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नांच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. मात्र, दुर्देवाने कोणीही मुळाशी जात नाही. फडणवीसांनी दिलेले आरक्षण टिकले होते. आघाडी सरकारने योग्य भूमिका न घेतल्याने आरक्षण टिकले नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी सर्वांना समान न्याय देणे गरजेचे असून संपूर्ण आरक्षणाची फेरमांडणी करावी लागेल, अशी मागणी केली.
खोत पुढे म्हणाले, मराठ्यांच्याखोत पुढे म्हणाले, मराठ्यांच्या पोरांनी शेती केली तरी माती अन् शाळा शिकली तरी माती होत आहे. मराठा समाज खेड्यापाड्यामध्ये राहणारा, शेती करणारा समाज आहे. कालातरांने शेतीचे तुकडे झाले आणि शेतावर पोट भागत नसल्याने शिकलेल्या मराठा समाजचं पोर नोकरीसाठी बाहेर पडलं. तेव्हा मराठा समाजाच्या पोरांच्या लक्षात आलं 100 मार्क मिळवूनही 50 मार्काचा पोरंगा पुढं जातो अन् आपण माग राहतो.
तेव्हा मराठा शेतकऱ्यांच्या पोरांनी शेती केली तरी माती होते अन् शाळा शिकलो तरी माती होत्या, त्यामुळे आता मराठा समाजाचा, शेतकऱ्याचा पोरगा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. मात्र, प्रस्थापित मराठे 70 वर्षे सत्तेवर होते ते काय गांजा ओढत होते का? की गोट्या खेळत होते? त्यांनी का मराठ्यांना आरक्षण दिले नाही. सध्या फक्त देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी आरक्षणाची हत्यार वापरली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.