खांटागळेत गोकुळच्या दुध दर कपात पत्राकाची होळी…

कोल्हापूर( प्रतिनिधी) :; एकीकडे वाढत्या पशुखाद्य दरामुळे दुग्धव्यवसाय धोक्यात आला असतानाच गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा दुध संघाने दुध दर कपात केली आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्य मोठा असंतोष निर्माण झाला आहे. करवीर तालुक्यातील खाटागळे गावात दुध उत्पादकानी गोकुळ च्या या गाय दुध कपातीचे परिपत्रकाची होळी केली.आंदोलन तिव्र करण्याचा निर्धार करण्यात आला .

या वेळी या आंदोलनाचे प्रमुख करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी म्हणाले ,गोकुळने गाय दुध दर कपात केली आहेच .त्या बरोबर इतर दुध संघापेक्षा म्हैस दुध दर कमी देउन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.लवकर त्या विरोधात संपूर्ण जिल्हयात लढा उभारणार आहेअसा इशारा दिला.

या आंदोलनात खाटांगळेचे माजी सरपंच तुकाराम पाटील, बाजीराव पाटील, प्रल्हाद जांभळे,रवी पाटील, प्रल्हाद पाटील, पांडुरंग पाटील, रघुनाथ पाटील, अमर पाटील, दत्ता पाटील, विश्वास पाटील, धनाजी पाटील, आदी दुध उत्पादक उपस्थित होते