सातारा : “माझी निवडणुकीची हौस भागली,” असं वक्तव्य उदयनराजे भोसलेंनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.“माझी निवडणुकीची हौस आता भागली आहे. बघता बघता पन्नाशी कधी ओलांडली समजलेदेखील नाही. आता कुठेतरी प्रत्येकानं थांबलं पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय असते. तसं, राजकीय नेत्यांनाही लागू करणं गरजेचं आहे. नाहीतर प्रत्येक राजकीय नेता लोकांचा आग्रह असल्यानं उभं राहिलो, असं सांगतात,” असा टोलाही उदयनराजेंनी यावेळी लगावला.