मनोज जरांगे-पाटील यांचा सभेपूर्वी सूचक इशारा!

जालना : जालन्यातील सभेमधून आज मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला संबोधित करणार आहेत. जालन्यात आज १४ ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण रॅलीतून एल्गार होणार आहे. या सभेपूर्वीच मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला सूचक इशारा दिला आहे.

आज होणाऱ्या रॅलीसाठी अंतरवली सराटीत काल रात्रीपासूनच गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे. या सभेमधून आज मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला संबोधित करणार आहेत. या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागून असतानाच जरांगे पाटील यांनी सभेपूर्वी ही आम्हा सामान्य मराठ्यांची लढाई आहे आणि ती आम्हाला जिंकायचीच आहे. मराठा जिंकणारचं, जिंकल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. येत्या १० दिवसांत सरकारला मराठा आरक्षण द्यावेच लागेल असा सूचक इशारा दिला आहे.