कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा तालुक्यातील काजू फळ पिकाचे उत्पादन विचारात घेता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी व सिंधुदुर्ग सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथेही स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
काजू फळ पिकाच्या विकासाकरिता १६ मे, २०२३ च्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेल्या “महाराष्ट्र राज्य काजू मंडळा” चे विभागीय कार्यालय रत्नागिरी व सिंधुदुर्ग सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे स्थापन करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.