गांधीनगरमध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांवर योग्य व वेळेवर उपचार व्हावेत ; करवीर शिवसेनेची मागणी

कोल्हापूर : करवीर शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) वसाहत रुग्णालय गांधीनगर हे ८ ते १० गावच्या गोरगरीब जनतेला मोफत उपचार मिळण्याचे ठिकाण पण हया वसाहत रुग्णालयामध्ये ब्लडप्रेशरच्या गोळया रूग्णांना वेळेवर मिळत नाहीत.

एखादा रूग्ण औषधा वाचून चक्कर येवून पडला तर त्यास जबाबदार कोण, खोकल्याचे औषध ही रुग्णांना मिळकत नाही. काही डॉक्टर व नर्स हे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना उध्दट बोलून बाहेर काढण्याचे अनेक प्रकार आपल्या रुग्णालयात घडत आहेत. अधिक्षकच हे वेळेत येत नसल्याने त्यांचा वचक डॉक्टर्स व नर्स यांचेवर राहिलेला नाही. अशी रूग्णांची तक्रार आहे. गरीब रुग्णांनाचा हा दवाखाना आहे येथे जर गरीब रुग्णांनवर उपचार होत नसतील तर दवाखाण्याचा उपयोग काय. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रूग्णालयात जावून रूग्णांनवर वेळेत उपचार होतात का, कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे, रुग्णालयात स्वच्छता आहे का, औषध साठा पुरेसा आहे का, अशा अनेक बाबी तपासण्यासाठी शिवसैनिकांनी आपले भागातील सरकारी दवाखान्यामध्ये जावून तपासणी करावी असे आदेश दिले आहे. त्या आदेशाच्या अनुषंगाने करवीर शिवसेनेच्या वतीने वसाहत रुग्णालय गांधीनगर येथे पाहणी करण्यात आली व रुग्णांनवर औषधोपचार करताना हायगय केली जावू नये, गोरगरीब जनतेवर तात्काळ उपचार करावेत व रूग्णांना सन्मानाची वागणूक मिळावी अशी मागणी करत वैद्यकीय अधिक्षकांना भेटून समस्याबाबत निवेदन देण्यात आले व येथून पुढे रूग्णांना औषधोपचाराविना पाठवूनये, सर्व येणाऱ्या रूग्णांवर चांगल्या पध्दतीने उपचार करण्यात यावेत अशी मागणी करवीर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने मा. विद्या पॉल, वैद्यकीय अधीक्षक, वसाहत रुग्णालय गांधीनगर यांना देण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक पॉल यांनी सांगितले की, कोणत्याही रुग्णाची गैरसोय होणार नाही व त्यांच्यावर वेळेत व योग्य उपचार करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले,युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, फेरीवाला संघटनेचे उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे,दिपक पोपटाणी, दिपक धिंग, संजय काळूगडे, शिवाजी लोहार, नागेश शिरवाटे,सुनील पारपाणी,विरेंद्र भोपळे, शंकर चंदवानी, सागर माने, राजू जाधव, शाहनवाज जमादार, जितु चावला, किशोर कामरा,आबा जाधव,मनोज कुरळे आदी उपस्थित होते.