अनिरुद्ध फौंडेशन मार्फत आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

साळवण ( एकनाथ शिंदे) : अनिरुद्ध फौंडेशन मुंबई यांच्या मार्फत उपासना केंद्र तिसंगी (ता गगनबावडा) येथे विनामूल्य आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. तालुक्यातील ७७ लोकांनी याचा लाभ घेतला. यावेळी अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीत कशा प्रकारे सामोरे जायला हवे याचे प्रशिक्षण देण्यात आले.

 या प्रशिक्षणासाठी तालुक्यातील तिसंगी, मणदूर, वेतवडे, साखरी, म्हाळुंगे, मुटकेश्वर, खडुळे, कोदे खुर्द, शेणवडे पैकी गुरववाडी, शेणवडे पैकी चौगलेवाडी, किरवे, आंबर्डे, हरपवडे, आतकिरवाडी आदी उपासना केंद्रातील श्रद्धावानांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेणेत आला.

या प्रशिक्षणाचे आयोजन अनिरुद्ध फौंडेशन व तालुक्यातील अनिरुद्ध बापू भक्ताकडून करण्यात आले.

🤙 9921334545