भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफ पाकिस्तानात ठार…

नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तो पाकिस्तानात लपून बसला होता. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

शाहिद लतीफ हा पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आणि पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. तो पाकिस्तानातील सियालकोटमध्ये लपून बसला होता.लतीफ एनआयएने युपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. २०१६ मध्ये जैश या दहशतवादी संघटनेकडून पठाणकोट एअरबेसवर हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये सात जवान शहीद झाले होते.

पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार सियालकोच्या बाहेर एका मशिदीत दहशतवागी शाहिद याची हत्या करण्यात आली. हल्लेखोर मोटरसायकलवर आले होते आणि त्यांनी शाहिदवर गोळ्या झाडल्या त्यानंतर ते फरार झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून हल्लेखोरांचा शोध घेणे सुरू आहे.

पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर ७२ तास कारवाई सुरू होती, ज्यामध्ये चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. यानंतर पाकिस्तानने त्यांचे मृतदेह स्वीकरण्यास देखील नकार दिला होता. तपासानंतर शाहिद लतीफ यानेच या दहशतवाद्यांना हत्यारे आणि इतर मदत पुरवल्याचे समोर आले होते. लतीफ याला १९९६ मध्ये अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती.

२०१० साली लतीफ याला तुरुंगातून सोडून पाकिस्तानला सोपवण्यात आले होते. तेव्हा इतर २० दहशतवाद्यांना वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानच्या हवाली करण्यात आले. यापूर्वी देखील दहशतवाद्यांनी लतीफला सोडवण्यासाठी प्लॅनिंग केली होती. कंधार प्लेन हायजॅक दरम्यान देखील दहशतवाद्यांनी त्याला सोडण्याची मागणी केली होती. तेव्हा १८९ प्रवाशांच्या बदल्यात मसूद हजहर याला सोडण्यात आले होते.

🤙 9921334545