आधी माहिती घ्या आणि मग बोला ; सुप्रिया सुळेंना टोला

सोलापूर: दोनच दिवसापूर्वी माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनीही सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर दिलं होतं. आपण काय काम केलं हे पाहायचे असेल तर आपल्याविरोधात माढा लोकसभा निवडणूक लढा असं थेट आव्हान त्यांनी सुप्रिया सुळे यांना दिलं होतं.

आता सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनीही सुप्रिया सुळे याना उत्तर देताना आधी माहिती घ्यावी असा टोलाही लगावला. मी लोकसभेत 97 टक्के उपस्थिती लावली असून विविध विषयावर 127 वेळा बोलल्याची माहिती उत्तर सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जयसिद्धेश्वर स्वामींवर टीका केली होती. त्याला आज जयसिद्धेश्वर स्वामींनी प्रत्युत्तर दिलं. पक्षाने संधी दिल्यास सोलापुरातून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर टीका करताना ते दिल्लीत फक्त एक-दोनवेळा दिसले आणि संसदेत ते कधी बोलले नसल्याची टीका केली होती.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 19 व्या युवा महोत्सवाचा शुभारंभ खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज येथे करण्यात आला. यावेळी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे , रिपाईचे राज्यसचिव राजाभाऊ सरवदे आणि स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बब्रुवान रोंगे उपस्थित होते.

🤙 9921334545