अंबाबाई मंदिरातील अतिक्रमण कारवाईला खासगी दुकानदारांचा विरोध का ?

कोल्हापूर: नवरात्रोत्सवाच्या तोंडावरुन मंदिर परिसरात साफसफाई करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाईही सुरु केली आहे.परंतु येथे चप्पल स्टॅन्ड ची दुकाने असणारे खाजगी दुकानदार या कारवाईला विरोध करत आहेत.

काही दुकानदार आम्ही गेल्या 20-25 वर्षांपासून इथे चप्पल स्टँड लावत आहोत, काही दुकानदार म्हणतात आम्ही 40 वर्षापासून इथं चप्पल स्टॅन्ड लावल आहे. हे चप्पल स्टँड हटवल तर आम्ही उदरनिर्वाह कसा चालवायचा. आमचं सुमारे आठ ते दहा सदस्यांचे कुटुंब आहे, हे स्टॅन्ड इथून हटवले तर आम्ही कोणाकडे जायचं असं या दुकानदारांचं म्हणणं आहे. या कारवाईविरोधात आम्हाला नोटीसही दिलेली नाही. हे सर्व प्रकरण कोर्टात आहे, तरीही मनपाने कारवाई सुरु केली आहे, असा आरोप येथील खासगी चप्पल स्टँड मालकांनी केला आहे.

अंबाबाई मंदिराच्या तोंडावर जी मूळ भिंत आहे, ती भिंत भाविकांना दिसायला हवी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती. मात्र या भिंतीला लागूनच चप्पलांचे स्टँड आहेत. त्यामुळे मूळ बांधकाम नेमकं कसं आहे, मंदिराची रचना कशी आहे, हे या चप्पलस्टँड आड झाकलं गेलं आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने नवं आणि अधिकृत चप्पल स्टँड उभं केलं आहे. मात्र जे खासगी चप्पल स्टँड आहे त्यामुळे मंदिराचं मूळ बांधकाम झाकलं होतं. तेच हटवण्याचा प्रयत्न मनपाने केला आहे.