वेतवडे येथे गव्याच्या हल्ल्यात महिला जखमी

साळवण ( एकनाथ शिंदे ) : वेतवडे तालुका गगनबावडा येथील महिला मंगल पांडुरंग गुंजवटे( वय – ३५ ) या शेतामध्ये उसाची भांगलन करीत असताना पाठीमागून येऊन गवा रेड्याने त्यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यांमध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे .

या वाढत्या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे .यावर प्रशासनाने खबरदारी म्हणून ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.