कोल्हापूर – मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्ते राजेंद्र शिवाजीराव तोरस्कर यांचा ६१ वा वाढदिवस उपोषणस्थळी साजरा करण्यात आला. या निमित्ताने अखिल भारत हिंदू महासभा, सकल हिंदू परिवार यांच्यातर्फे गायीस चारा घालण्यात आला.
यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप, बंडादादा साळोखे, प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार घोरपडे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष दिपाली खाडे, शहराध्यक्षा साधना कोठावळे, शिवसेनेचे किशोर घाटगे, अवधूत भाटे, निर्मला कुराडे आदींची उपस्थिती होती.