कागलमधील त्या..कागदपत्रात दडलंय काय? जिल्हा परिषद कर्मचारी दबावाखाली…!

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या दिपक कुराडे या शाखा अभियंत्यांनी चक्क 6 लाख भरून माहीती अधिकारात कागल तालुक्यातील कामाची माहिती मागवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कागल मधील राजकीय नेत्यांच्या जवळच्या या ठेकेदार पुढाऱ्याच्या गैरव्यवहाराची लक्तरे वेशीवर टागली जाणार आहेत. एकाच कामाची दोन -दोन वेळ दबाव आणून बिले काढले चे बिंग फुटणार आहे. या सर्व संगनमताने केलेल्या व्यवहारात अनेक कर्मचारी भरडणार आहेत.चौकशीच्या या फेर्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी दबावाखाली आहेत.
जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हंटले जाते.

ग्रामीण विकासाचे हे जिल्ह्याचे प्रमुख केंद्र आहे. या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून 25: 15 या हेडखाली विकास निधी दिला जातो. कागल तालुक्यातील गल्ली बोळाचे रस्ते, गटारी ,सभागृह, बांधकामे केली आहेत. अलिकडच्या काळात कार्यकर्तेच ठेकेदार झालेत. नेत्यांनी ही त्याना पोसण्यासाठी पालकत्व स्विकारले आहे . एकाच कामाचे दोन वेळ बिले काढली जातात असा संशय व्यक्त केला जात आहे.

कामाचा तर दर्जा नाहीच. रक्कम उकळण्यासाठी नेत्यांचे नाव वापरून दबाव आणल्याने बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांची तीन माकडाच्या गोष्टी सारखी स्थिती झालीय.आता हे सर्व शाखा अभियंता दिपक कुराडे या प्रामाणिक अधिकाऱ्यामुळे उघड होणार आहे. कुराडे यांनी जिल्हा परिषद सोसायटीतून कर्ज काढुन माहिती अधिकारात कागल तालुक्यातील या विकास कामाची कागदपत्रे मागवली आहेत तीन आठवडे झाली तरी कागदपत्रे मिळाली नाहीत.

झेरॉक्स काढताना अनेकजण घामाने भिजलेत. कुराडेंनी बांधकाम विभागात काम केल्याने काळेबेरे व्यवहार ऊघड होणार असल्याने जिल्हा परिषदेतील कर्मचारी भितीखाली आहेत . ठेकेदार असलेले पांढरे डगले घालुन हे कार्यकर्ते जिल्हा परिषदेत येउन चौकशीचा अंदाज घेत आहेत. कुराडीचा दांडा आता गोत्यास काळ ठरणार आहे. या पूर्वी की बाहेर घेऊन जाणे व पासवर्ड बदलण्याचे धाडस ही ठेकेदार पुढाऱ्यांनी केले होते पण वरिष्ठ अधिकाऱ्यानी त्याना अभय दिल्याने जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याची मजल गेली आहे.

आलिशान गाड्यातून जिल्हा परिषदेत येउन दबाव आणत असल्याने कर्मचारी रक्तदाब वाढून मरण्यापेक्षा नोकरी नको असे म्हणत आहेत. कुराडेनी माहिती अधिकारात मागणी केलेल्या या कागदपत्रात दडलयं काय ? याचीच उत्कंठा सर्वाना लागली आहे.

🤙 9921334545