मुंबई : अभिनेता गोविंदा 90 च्या दशकात प्रत्येक चित्रपट निर्मात्याची पहिली पसंती असायचा. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. हा अभिनेता एकाच वेळी डझनभर चित्रपट साइन करत असे, मात्र तो बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही.
गोविंदाला 14 वर्षांपासून एका हिट चित्रपटाची आस आहे. आता एका सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने गोविंदाची खरडपट्टी काढताना अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. काय म्हणाले हे दिग्दर्शक जाणून घ्या.हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांनी 90 च्या दशकात इंडस्ट्रीत खूप काम केले होते, तर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत. पण लवकरच त्याच्या करिअरमध्ये एक वेळ आली जेव्हा त्याचे स्टारडम कमी होऊ लागले आणि त्याच्या करिअरचा आलेखही घसरायला लागला.
आज परिस्थिती अशी आहे की तो चित्रपटसृष्टीपासून पूर्णपणे दूर आहे. आता सुप्रसिद्ध दिग्दर्शक पहलाज निलानी यांनी अभिनेत्याची चांगलीच शाळा घेतली आहे.दिग्दर्शक पहलाजने बॉलीवूड ठिकानाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘वास्तविक या सर्व समस्या डेव्हिड धवनमुळे सुरु झाल्या. त्यांना वाटले की मी गोविंदाला कास्ट केले म्हणून चित्रपट हिट होतात आणि जेव्हा मी अनिल कपूरला कास्ट केले तेव्हा त्यांना वाटले की मी फसवणूक केली आहे. यानंतर त्याने गोविंदाला माझ्याविरुद्ध खूप भडकवले.
अनेकांनी मला याबद्दल सांगितले आणि आम्ही वेगळे झालो. त्याच्यामुळे गोविंदाने माझा एक चित्रपट अपूर्ण सोडला होता.’याविषयी अधिक बोलताना दिग्दर्शक म्हणाले, ‘नंतर कसेतरी आम्ही रंगीला राजामध्ये एकत्र कामही केले. हा रजनीकांतच्या चित्रपटाचा रिमेक होता, ज्यामध्ये गोविंदाने एक दमदार भूमिका साकारली होती. माझ्या मते, त्याने रजनीकांतपेक्षा चांगले काम केले होते. मला खात्री होती की हा चित्रपट त्याच्या करिअरसाठी एक उत्तम चित्रपट ठरेल. मात्र या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने इंडस्ट्रीच्या विरोधात तक्रारी सुरू केल्या आणि सलमान आणि शाहरुख खानवर निशाणा साधला. यानंतर अखेरच्या क्षणी सर्व शो रद्द करण्यात आले आणि बघा आज गोविंदा घरी बसला आहे.’ असं म्हणत दिग्दर्शक पहलाज निलानी यांनी अभिनेत्यावर निशाणा साधला आहे.
गोविंदा अनेकदा अनेक प्रसंगी इंडस्ट्री आणि अनेक अभिनेत्यांविरोधात बोलला आहे, पण नंतर गोविंदा आणि सलमानच्या नात्यात काहीशी सुधारणा झाल्याचे दिसले होते. 2007 मध्ये ‘पार्टनर’ चित्रपटातही दोघे एकत्र दिसले होते. मात्र, गोविंदाने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत लव्ह 86, हटिया, हम दो कैदी, आंखे, साजन चले सासूराज आणि हीरो नंबर वन यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
