मुंबई: सध्या भारतीय सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळतेय. पितृपक्षाचा काळ सुरु असल्याने दोन्ही धातूंला मागणी कमी असल्याने दरात घसरण होत आहे.तर दुसरीकडे आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोने आणि चांदीच्या कितमीत मोठी घसरण झाल्याचे दिसतेय.
ऑक्टोबर महिन्याची सुरुवात चांगली झाली असून गगनाला भिडले सोने -चांदीचे दर आता खूपच खाली आहे. घसरणीनंतर आता सोन्याचा भाव 56600 च्या जवळ आला आहे. बऱ्याच काळानंतर सोन्याच्या दरात अशी घसरण पाहायला मिळत आहे. याशिवाय आज चांदीचा भावही 4 टक्क्यांहून अधिक घसरून 66,000 रुपयांच्या पातळीवर गेला आहे.
MCX वरील दर?आज (मंगळवार) MCX वर सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोने 1.50 टक्क्यांच्या घसरणीसह 56,249 रुपयांवर म्हणजेच 856 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ट्रेंड करत आहे. तर चांदीचा भाव 4.26 टक्क्यांनी म्हणजेच 3001 रुपयांनी घसरून 66,856 रुपयांवर ट्रेंड करत आहे.सोने 5154 रुपयांनी स्वस्त:दरम्यान, 6 मे रोजी MCX वर सोन्याची किंमत 61,845 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी पातळीवर होती आणि आज MCX वर सोन्याची किंमत 56,249 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर आहे. त्यानुसार सध्या सोने 5596 रुपयांनी स्वस्त होत आहे.