शिरोली दुमाला येथे स्वच्छता अभियान संपन्न..

बहिरेश्वर (प्रतिनिधी : आपल्या देशात 2आॅक्टोबर हा दिवस महात्मा गांधी जयंती व जागतिक स्वच्छता दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.ग्रामपंचायत शिरोली दुमाला येथे देखील सर्वपक्षीय पदाधिकारी एकनाथ विद्यालय ,बा.पू पाटील विद्यालय,कन्या वि.मं.शिरोली व ग्रामस्थ यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

याप्रसंगी गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन संचालक विश्वासराव पाटील (आबाजी) कुंभी कारखान्याचे संचालक किशोर पाटील ,एस के पाटील,माधव पाटील ,सरदार पाटील नाना ,बाळासो पाटील ,कृष्णात पाटील ,ज्ञानदेव पाटील, एकनाथ पाटील, बा पू पाटील हायस्कूल ,कन्या विद्यामंदिर, एकनाथ विद्यालय शिरोली दु चे सर्व शिक्षक व विद्यार्थी अंगणवाडी सेविका ,ग्रामविकास अधिकारी आर के पाटील, ग्रा.पं.कर्मचारी, गावातील सर्व सहकारी संस्था, दूध संस्था ग्रामस्थं व तरुण मंडळे उपस्थित होते.*