शरीरामध्ये उष्णता वाढली आहे …. पाहूया कारणे

अनेक लोकांना उष्णतेचा त्रास हा सामान्य आरोग्य समस्या होऊन जाते. एवढी सामान्य की त्यांना हा दैनंदिन आयुष्याचा एक भाग वाटू लागतो.शरीरात ही उष्णता निर्माण होण्यास काही कारणे असतात आणि ती म्हणजे उष्णता निर्माण करणारे काही पदार्थ.तसे शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ खूप आहेत. पण काही पदार्थ जे खूप सामान्य आहेत आणि कळत नकळत आपण ते रोज वापरतो त्यांच्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ माहिती पाहिजे असेल तर मसालेदार पदार्थांना वगळून कसे चालेल.शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी सर्वात जास्त कारणीभूत घटक म्हणजे मसालेदार पदार्थ. तेच मसालेदार पदार्थ जे आपल्या स्वयंपाकघरात असतात. जे आपण आपल्या जेवणामध्ये वापरतो.यामध्ये आपण सामान्यपणे दाररोज वापरत असलेल पदार्थ म्हणजे लाल मिरची पाऊडर,गरम मसाला,दालचीनी,लवंग तसेच हिरव्या मिरची,काश्मिरी मिरची सारख्या बरेच तिखट असणारे पदार्थ आपण वापरत असतो.

आपल्या महाराष्ट्रात तेलकट पदार्थ खाणारे लोक जास्त आहेत. जसे की कोणत्या रस्सा असणाऱ्या भाजीमध्ये त्यांना वरुण तर्ही पाहिजे असते.असो.पण सतत असे तेलकट जेवण सेवन केल्याने तुमच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा म्हणजेच उष्णता निर्माण होते आणि पित्त,त्वचा विकार वगैरे आजार उत्पन्न होतात.या अनुषंगाने तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील.तळलेले पदार्थ हे खायला जेवढे चविष्ट असतात तेवढेच ते आरोग्यासाठी घातक असतात.तळलेले पदार्थांमध्ये देखील तेलाचे प्रमाण खूप राहते. त्यामुळे त्यातील fatty acids चे विघटन होऊन उष्णता निर्माण होते.तसेच यामध्ये पदार्थ तळल्या नंतर आपल्या शरीरात जे तेल जाते ते पचवायला म्हणजेच digestion साठी अधिक ऊर्जा खर्ची पडते. एवढ्या प्रमाणात जर ऊर्जा खर्ची पडत असेल आणि वापरली जात असेल तर त्यातून सहाजिक उष्णता निर्माण होते.

यामध्ये फक्त अतिगोड असे ग्राहित न धरता फक्त गोड पदार्थ लक्षात घेतले तरी चालेल. कारण गोड कमी प्रमाणात किंवा कमी गोड असणारे पदार्थ जरी सेवन केले तर कमी अधिक प्रमाणात त्यातून उष्णता निर्माण होऊन आपल्याला त्रास देऊ शकतात.शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ जर बघितले तर गोड पदार्थ मी म्हणेल की सर्वात जास्त उष्णता निर्माण करतात.

अल्कोहोल म्हणजे दारू,वाईणे,व्हिस्की किंवा कोणतेही पेय ज्यामध्ये अल्कोहोल हा घटक आहे,यामुले देखील तुमच्या शरीरात खूप परांनात उष्णता निर्माण होऊ शकते.अल्कोहोल हा घटक वासोडिलेटर आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा दारूचे किंवा अल्कोहोल चे सेवन करता तेव्हा शरीरातील रक्तवाहिन्या यामुले फुगतात.यामुळे रक्तवाहिन्यांची जाडी कमी होऊन आतमधील पोकळी वाढते.

आतमधील जागा वाढली की त्यामध्ये अधिक रक्तपुरवठा होतो. ही सर्व प्रक्रिया त्वचेच्या वरच्या भागावर जास्त प्रमाणात होते.यामुळे त्वचेच्या वरच्या भागात जास्त प्रमाणात रक्तपुरवठा होतो. रक्तपुरवठा जास्त झाल्यामुळे तिथे उष्णता निर्माण होऊन त्या संबंधीचा त्रास होतो.

🤙 8080365706