कोल्हापूर : जलजीवन नळ पाणीपुरवठा कामाचे 12 लाख रुपयांचे बिल मंजूर केले म्हणून तीन टक्के कमिशन म्हणून 33 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या चंदगड तालुक्यातील महिला उप अभियंता सुभद्रा कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ताब्यात घेतलं.. त्यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , चंदगड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची उपअभियंता सुभद्रा लक्ष्मणराव कांबळेनं (रा. बेळगाव, हनुमान नगर, भक्तीवेस मंगल कार्यालयाजवळ, मूळ पत्ता, सी वन-506, साकेत पॅराडाईज, आधारवाडी जेल रोड, कल्याण पश्चिम जि. ठाणे) केली होती. तडजोडीअंती 25,000 रुपये लाच स्वीकारताना सुभद्राला रंगेहाथ सापळा रचून पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं ही कारवाई केली.
या प्रकरणातील तक्रारदार ठेकेदार असून त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रार दाखल केली होती.बिल मंजूर केल्याने तीन टक्के लाचयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार ठेकेदार आहे. मुळ ठेकेदारांनी जलजीवन मिशन योजनेंतर्गत चंदगड तालुक्यातील घुल्लेवाडीमधील नळपाणी पुरवठा योजना सुधारीकरणाचे काम घेतलं होतं.
घुल्लेवाडीमध्ये जलजीवन नळपाणी पुरवठा कामाचे बिल मंजूर केले म्हणून तक्रारदाराकडे मंजूर केलेल्या 12 लाख रुपयांच्या बिलामध्ये उपअभियंता असलेल्या सुभद्रा कांबळेनं तीन टक्के दराने 33,000 रुपये लाचेची मागणी केली. यानंतर तडजोडीअंती 25,000 रुपये लाच देण्याचे ठरले होते. लाचेची ठरलेली रक्कम तक्रारदाराकडून स्वतः सुभद्रा स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. आरोपी सुभद्रा लक्ष्मणराव कांबळेविरोधात चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनात पोसई संजीव बंबरगेकर, पोहेकॉ विकास माने, सुनील घोसाळकर, पोना सचिन पाटील, मपोकॉ पुनम पाटील ,चापोहेकॉ विष्णू गुरव यांनी केली. कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकारी/कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खासगी एजटांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तत्काळ आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.