‘आयकॉन इंडस्ट्रियल पार्क’ चे उद्घाटन संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अंबप येथील ३५ एकर जागेवरील उद्योगजगतात चर्चा होणाऱ्या ‘आयकॉन इंडस्ट्रियल पार्क’ या औद्योगिक प्लॉटच्या प्रकल्पपूर्तीचा सोहळा संपन्न झाला. गणेश उत्सवाच्या काळातील या सोहळ्यात भव्य गणेश मंदिरात श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा झाली. व खऱ्या अर्थाने उद्योग क्षेत्रात नवी दिशा देण्याचा ‘श्रीगणेशा’ झाला. इंडस्ट्रित प्लॉटधारकांच्या सोसायटीचे सुसज्ज ऑफीस ही सभासदांकडे सुपूर्त करण्यात आले.

उद्योग क्षेत्रातील आधुनिक गरजा, मुलभूत सुविध म्हणजे केवळ इन्फ्रास्ट्रक्चर नव्हे तर उद्योजकांना हवे असणारे सकारात्मक वातावरण, भविष्यकालीन दृष्टिकोन व सहकार्याची भावना देणारा हा प्रकल्प प. महाराष्ट्रातील उद्योजकांना नवी व्यावसायिक संकल्पना देत आहे.

आयकॉन इंडस्ट्रियल पार्क ही कल्पना प्रत्यक्षात येत असताना उद्योगक्षेत्रातील नव्या पिढीसाठी, विस्तारीकरणासाठी, निर्यातभिमुख व्यवस्थापनासाठी, उत्पादनासाठी ही भूमी ‘ऊर्जा’ ठरेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

या प्रसंगी विविध औद्योगिक संघटनांचे सभासद, अध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते. टाऊनस्केप बिल्डकॉन एल एल पी चे राजीव परिख, आनंद माने, अभिजीत मगदूम, सचिन झंवर, चेतन वसा, उत्तम फराकटे, अशोक मालू, संजय होसमनी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

या प्रसंगी खा. धनंजय महाडीक, खा. धैर्यशील माने, मालोजीराजे छत्रपती, आ. जयश्री जाधव, डॉ. संजय डी पाटील, माजी आ. सुजित मिणचेकर, सौ. दिपा माने सरपंच, अंबप, विद्यानंद बेडेकर, संदिप मिरजकर, – यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ उद्योजक संजय शेटे, सुरेंद्र जैन, राजू पाटील, भरत जाधव ( स्मॅक ), नाना कदम, कांतीभाई चोरडीया, अजित नरके, सचिन मेनन, सचिन शिरगांवकर, चंद्रशेखर डोली, गिरीश रायबागे, दिनेश बुधले, दिपक चोरगे, अजित आजरी यांच्या उपस्थितीने या प्रकल्पाने नवी झेप घेतली आहे.

🤙 9921334545