कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील एका हॉटेलमध्ये ६ तरुण आणि ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आले. या ठिकाणी निर्भया पथकाने छापेमारी करून त्यांना ताब्यात घेतले आहे, या प्रकरणाची सध्या कोल्हापूरनगरीत चांगली चर्चा सुरू आहे.
कोल्हापूरमध्ये निर्भया पथक चांगले सक्रिय झाले असून या पथकाकडून करण्यात आलेल्या छापेमारीत एकूण सहा तरूण जोडपी नको, त्या अवस्थेत आढळली. म्हणजेच ती अश्लील चाळे करत होते. सदर घटनेमुळे कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळा चौकातील टोकियो कॅसल कॅफेवर आज निर्भया पथकाने छापेमारी केली. या कॅफेमध्ये तरुण मुले-मुली अश्लील चाळे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुप्त माहितीनुसार छापेमारीत धक्कादायक वास्तव समोर आले. निर्भय पथकाच्या छापेमारीत कॅफेमध्ये पाठच्या बाजूलाला काही अंधाऱ्या खोल्या असल्याचे समोर आले.
यातील काही खोल्यांमध्ये बेड देखील होते. त्यामुळे निश्चितच येथे काहीतरी काळे धंदे चालत असावेत, असा संशय पोलिसांना आधीच आला होता. निर्भया पथकाच्या कारवाईनंतर कॅफे मालकांचे धाबे दणाणले आहेत. महिलांसंदर्भात मदतीसाठी असलेला हेल्पलाईन, संपर्क क्रमांक १०३ आहे. महिलांना असुरक्षित वाटत असल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.