कोपार्डे – कुंभी कासारी साखर कारखान्याने हंगाम २०२३/२४च्या हंगामात ६ लाख तीन हजार मेट्रीक टन गाळप केले असून १२.७३ टक्के सरासरी साखर उताऱ्याने साखर उताऱ्यासह ७ लाख ६३ हजार ३०० क्विंटल साखर उत्पादन झाले असून ३ हजार १५० रुपये प्रतिटन संपूर्ण एफआरपी दिली आहे येत्या नैसर्गिक परिस्थितीमुळे येत्या काळात ऊसासह साखरेचे उत्पादन घटणार आहे.यामुळे साखरेला चांगला दर मिळेल.
केंद्र शासनाने निर्यात धोरणाला प्रोत्साहन द्यावे अशी मागणी माजी आ. अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी केली.सी.बी.जी.प्रकल्प बीओटी तत्वावर करण्यासाठी सभेपुढे प्रस्ताव ठेवला व त्याला सभेकडून मान्यता देण्यात आली. आज कुंभी कासारी साखय कारख्यान्याची ६२ वी सभा कार्यस्थळावर पार पडली यावेळी अध्यक्ष नरके बोलत होते.उपाध्यक्ष विश्वास पाटील,सर्व संचालक, कार्यकारी संचालक धिरजकुमार माने यांची प्रमुख उपस्थिती होती. सचिव प्रशांत पाटील सभेपुढील वाचन सुरू केले यावेळी ११ पैकी केवळ ताळेबंदावर काही काळ चर्चा झाली. अन्यथा सर्व विषय बहुमताने मंजूर झाले.
ताळेबंदावर बाळासाहेब खाडे यांनी कारखान्यावर एमएससी बँकेचे कर्ज जिल्हा बँकेकडे वर्ग करताना ४५ कोटी वाढले आहे. साखर तारण,ठेवीव चालू देण्याच्या तरतुदी व भांडवली तारण कर्ज मिळून ४२४ कोटी कर्ज असल्याचा आरोप केला. यावेळी अध्यक्ष नरके यांनी याबदल्यात कुंभी कासारी कारखान्याचे ३७९ कोटी भांडवल उभा आहे. तर ६५ कोटीची साखर शिल्लक आहे. कर्जे ही एफआरपी देताना झालेल्या तोट्याची आहेत.आमचे कोणतेही खाते एनपीएत नाही असे सांगितले.
हिंदूराव पाटील (खुपीरे),भगवान पाटील (कोगे), सदाशिव शेलार यांनी प्रतिदिन गाळप क्षमता ७ हजार ते १० टन करावी तरच ७ लाख गाळप उदिष्ट पुर्ण करता येईल.शेतकरी दरापेक्षा शेत रिकामे करण्याची माणसिकता ठेवत आहे.
यासाठी काय नियोजन केले याबद्दल चर्चा करावी असे सांगितले.नरके यांनी यावर्षी कोणताही अतिरिक्त खर्च न करता ४०० मेटनांनी गाळप क्षमता वाढवत आहे असे सांगितले बाजीराव देवाळकर (कोपार्डे) पांडुरंग शिंदे यांनी एफआरपी पेक्षा ४०० जादा दराची स्वाभिमानी संघटनेची मागणी असल्याचे सांगितले.
महादेव माळी (आडूर) यांनी कारखान्याला १३ हजार ऊसपुरवठा करत नाहीत.या सभासदांच्या सवलतीची साखर १० ऐवजी २० रुपये करा अशी सुचना केली. यावेळी पंडीत कांबळे यांनी शेती अधिकारी व चिटबॉय, गटक्लार्क शेतकऱ्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. आडसाली लागण हंगाम समाप्तीला गेली दोन एकरात केवळ ४९ टन ऊस झाल्याची व्यथा मांडली.
यावेळी साखरेला ४५ तर इथेनॉलला ६५ रूपये दर बांधून दिला तर कारखाने आर्थिक आरिष्टातून बाहेर पडतील. केंद्र शासनाने आयकर माफ केल्याने २३५ कोटी वाचले याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.एकूणच सभा खेळीमेळीत झाली.दरवर्षी सभेला येणारे रणधुमाळीचे स्वरूप यावर्षी दिसले नाही.