दोनवडे (प्रतिनिधी ) : खुपिरे ता. करवीर येथे प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी ही श्री गणेश मूर्तीदान उपक्रमास ग्रामपंचायती ने आवाहन केले होते त्या उपक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. येथील गाव तलाव परिसरात मूर्तीदान कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी सरपंच तृप्ती पाटील, उपसरपंच सागर पाटील ,तंटामुक्त अध्यक्ष आबासाहेब पाटील ,ग्रामपंचायत सदस्य युवराज पाटील ,सचिन कुंभार ,अमर कांबळे, कोतवाल शिवाजी गुरव, संजय दादू पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी रवी हराळे,मोहन भाट ,शहाजी हराळे आदींनी परिश्रम घेतले.