नेहमी मूड चांगला ठेवायचा आहे… तर वेळीच लक्ष देणे महत्त्वाचं

आपला मूड कसा आहे याचा फक्त आपल्या आरोग्यावरच नव्हे तर आसपासच्या लोकांवरही परिणाम होता. म्हणजे तुम्ही छान, रिलॅक्स मूड मध्ये असाल तर सगळ्यांनाच आवडता पण जर तुमची सतत चिडचिड होत असेल, किंवा दु:खी रहात असाल तर लोक तुमच्यापासून दूर राहणंच पसंत करतात. कधीकधी काही प्रॉब्लेम्समुळे मूड खराब होतो, पण खराब मूडची ही समस्या कायम असेल तर त्याकडे वेळीच लक्ष देणे महत्वाचे ठरते.

मूड चांगला ठेवण्यासाठी, दैनंदिन दिनचर्या तर सुधारायला हवीत पण त्यासोबतच काही पदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश केल्यास फायदा होऊ शकतो.खरंतर, आपला मूड हा हार्मोन्सशी देखील संबंधित असतो. जेव्हा आपण कोणतही आवडतं काम करतो, तेव्हा डोपामाइन हार्मोन बाहेर पडतं, ज्यामुळे आपल्याला तणावापासून आराम मिळतो, रिलॅक्स वाटतं. तसंच काही पदार्थ खाल्ल्याने सेरोटोनिन वाढते जे मन शांत ठेवण्यास मदत करते. कोणते पदार्थ खाल्ल्याने मूड फ्रेश राहू शकतो, ते जाणून घेऊया.

डार्क चॉकलेटशरीरात हॅपी हार्मोन्स वाढवायचे असतील तर डार्क चॉकलेट खाणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सीडेंट्स आपला मूड सुधारण्यास मदत करतात. पण ते एका ठराविक प्रमाणातच खावे.ड्राय फ्रुटस आणि बियाबदाम, शेंगदाणे, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया, तीळ, भोपळ्याच्या बिया यासारखे ड्रायफ्रुट्स आणि बिया यांचा आहारारत समावेश करावा. त्यामुळे सेरोटोनिनचे उत्पादन वाढते, ते आपला मूड सुधारण्यास मदत करते. तसेच या पदार्थांच्या सेवनाने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.पालकमॅग्नेशियम आणि लोहासारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पालकाचा आहारात समावेश करणे अतिशय फायदेशीर ठरते. कधीकधी मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे चिंता आणि तणावासारख्या समस्या देखील उद्भवतात.

पालक खाल्ल्याने सेरोटोनिनची पातळी सुधारते, ज्यामुळे मूड सुधारतो.सफरचंदसफरचंद हे केवळ हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम नाही तर त्यामुळे आपला मूडही सुधारू शकतो. मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी देखील सफरचंदाचा आहारात समावेश फायदेशीर ठरतो.

🤙 9921334545