नोएडा : उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात मानवतेला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. इथल्या नोएडामध्ये कर्जाची परतफेड न केल्याने गुंडांनी भाजी बाजारातील विक्रेत्याला बेदम मारहाण केली.एवढेच नाही तर त्याला विवस्त्र करून बाजारपेठेत त्याची धिंड काढली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एफआयआर नोंदवल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे प्रकरण पोलीस स्टेशन फेज-2 परिसरातील फळ मार्केटशी संबंधित आहे. येथे एका लसून विक्रेत्याने 3000 रुपयांचे कर्ज घेतले होते मात्र तो ते वेळेत फेडू न शकल्याने गुंडांनी त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याला विवस्त्र केले. पिडीत व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे सोमवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पथक तैनात करण्यात आले होते. मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे.
उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.एवढेच नाही तर त्याला विवस्त्र करून बाजारपेठेत त्याची धिंड काढली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे प्रकरण पोलीस स्टेशन फेज-2 परिसरातील फळ मार्केटशी संबंधित आहे.
येथे एका लसून विक्रेत्याने 3000 रुपयांचे कर्ज घेतले होते मात्र तो ते वेळेत फेडू न शकल्याने गुंडांनी त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याला विवस्त्र केले. पिडीत व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे सोमवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पथक तैनात करण्यात आले होते. मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे.