कोल्हापूर( प्रतिनिधी) : आधुनिक भारताचे कृषि, औद्योगिक, शिक्षण क्षेत्राचे जे मापदंड निर्माण झाले त्यामध्ये सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यां यांचे अथक परिश्रम, कौशल्य, बुध्दीमत्ता याचा सिंहाचा वाटा आहे. अशा या महान व्यक्तिमत्त्वाच्या जन्म दिवसी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून इंजिनिअर डे क्रिडाई कार्यालयात साजरा करण्यात आला.
आजचा अभियंता दिवस म्हणजे तमाम अभियंत्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमास कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपशहर रचनाकार रमेश मस्कर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सर मोक्षगुंडम विश्वेश्वरयां यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के.पी.खोत, सहखजानिस सचिन परांजपे, संचालक विजय माणगांवकर, लक्ष्मीकांत चौगुले, अदित्य बेडेकर, संदिप पोवार, नंदकिशोर पाटील, अमोल देशपांडे, सभासद प्रकाश देवलापूरकर, संजय डोईजड,पवन जामदार,चेतन चव्हाण, सुधीर हंजे, नारायण पोतदार, महेश ढवळे, ॠषीकेस खोत, तुषार बेर्डे हजर होते.