मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचया ७३ व्या वाढदिवदनिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकाऱण्यांपासून सामान्य माणसांपर्यंत अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छांबरोबर शाहरुखने मोदींना एक सल्लाही दिला आहे.शाहरुखने ट्वीट करत मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखने लिहिलं ” ‘माननीय नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमचा दिवस आरोग्य आणि आनंदाने भरलेला जावो. तुम्ही कामातून थोडा वेळ काढा आणि मजाही करा. शुभेच्छा.शाहरुख व्यतिरिक्त अभिनेता सलमान खानने देखील पंतप्रधान मोदींना ट्वीट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शाहरुखन लिहिलं. “माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.” याशिवाय वरुण धवनने पीएम मोदींचा एक फोटो शेअर करत लिहिले, “प्रिय सर, तुम्ही सिंहासारखी गर्जना करता आणि जग टाळ्या वाजवते. वाढदिवसाच्या शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. जयहिंद..” अशा हटके शुभेच्छा दिल्या आहेत.