वाराणसी येथून खळबळजनक बातमी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी येथून खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे.

वाराणसी विमानतळावर तैनात असलेल्या अधिकाऱ्याला अज्ञात क्रमांकावरून फोन करून विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आली.दिल्लीतील जी-20 शिखर परिषदेदरम्यान वाराणसी विमानतळ उडवून देण्याची धमकी दिल्याने उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

🤙 8080365706