भाजपा शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्री केसरकर यांची भेट

कोल्हापूर: भाजपा कोल्हापूर महानगर चे पदाधिकारी शिष्टमंडळ जिल्हाअध्यक्ष विजयजी जाधव यांच्या अध्यक्षेतेखाली पालकमंत्री दीपक केसरकर यांना भेटले.

यावेळी खालील विषयांवर मुद्देसुद चर्चा झाली. २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन असलेने त्या दिवशी आपला जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करण्यात यावा. याच वेळी MTDC चे उपप्रादेशिक कार्यालय सुरु करण्यात यावे, मार्च २०२३ पासून प्रलंबित असलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी कार्यकर्त्यांच्या निवडी नियुक्ती संदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करणेत आली.सदर यादी ६ महिने होऊन सुद्धा प्रलंबित आहे त्या सर्व नियुक्त्या तत्काळ पूर्ण कराव्यात, पारंपारिक वाद्यांच्या गजरात सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन मिरवणुकी वेळी कार्यकर्ते व पारंपारिक वाद्यांवर दाखल झालेले गुन्हे अत्यंत निषेधार्ह आहे, ते त्वरित काढून टाकण्यात यावे. अन्यथा भविष्यात तरुण पिढी पारंपारिक वाद्यांकडे वळणार नाही. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांवर अशी कारवाई भविष्यात होऊ नये. शहरांमध्ये रस्ते दुरुस्ती, इतर सुविधा आणि विविध विकास कामाकरिता ४० कोटींचा विकास निधी त्वरित मंजूर करावा. अशा विविध मागण्या जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केल्या.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर आवरामध्ये भक्तांच्या सोयीसाठी डॉक्टर संदीप पाटील यांच्या अधिपत्या खाली अतिशय चांगल्या पद्धतीत सुरु असलेले प्राथमिक उपचार केंद्र बंद करून अन्यत्र का हलवण्यात आले ? व कोणाच्या सांगण्यावरून हलवण्यात आले ? अशी विचारणा करून ज्या ठिकाणी आजपर्यंत मागील ३ वर्षांत २२ हजारपेक्षा जास्त भक्तांनी या उपचार केंद्राचा लाभ घेतला होता, ते बंद करणे हि खूप मोठी चूक झाली आहे याकडे लक्ष वेधले तसेच वर्षानुवर्ष जमिनीखाली गाढले गेलेले मणिकर्णिका कुंडाचे ६० x ६० व ४० फुट खोल उत्खननाचे काम भारतीय पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली १० महिन्यात जेवढे पूर्ण झाले होते. त्याप्रमाणात गेल्या २ वर्षात १ % देखील काम पूर्ण झालेले नाही याकडे लक्ष वेधून तेथील सुशोभीकरण करण्याचे काम त्वरित मार्गस्थ करावे.व गरुड मंडपाचे काम त्वरित निधी मंजूर करून लवकरात लवकर पूर्ण करावे अशी आग्रही मागणी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश जाधव यांनी केली.शहरातील विविध विकास कामांसाठी व अनेक उपक्रमांसाठी अन्य महानगरपालिकांच्या तुलनेत कोल्हापूर महानगरपालिकेस मिळणारा तुटपुंजा निधी याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून मुख्यमंत्र्यांकडे विशेष भरघोस निधीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम यांनी केली.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव , महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश जाधव, नाना कदम, संजय सावंत, गायत्री राऊत, डॉ. सदानंद राजवर्धन, राजू मोरे, हेमंत आराध्ये, आप्पा लाड, सचिन तोडकर, विराज चिखलीकर, संतोष भिवटे, विजय खाडे, राज सिंह शेळके, सौ. मंगल निपाणीकर, रशीद बारगीर, रोहित पवार, अनिल कामत इ. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706