
पुणे : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अहमदनगर येथील कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याने आत्महत्या केली आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेऊन त्याने आपलं जीवन संपवलं आहे.
आज पहाटेच्या सुमारास त्याने गळफास लावला. पोलिस पहाटे गस्तीवर गेले असताना पोलिसांना जितेंद्र शिंदेचा मृतदेह आढळून आला.कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणी जितेंद्र शिंदे हा मुख्य दोषी होता. तो पुण्यातील येरवडा कारागृहात तो आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होता. आज सकाळी त्याने अचानकपणे गळफास घेऊन आत्महत्या केली. खरं तर कारागृहात कैद्याने आत्महत्या करणे ही गंभीर बाब आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी पोहचले आहे. सदर आरोपीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचं शवविच्छेदन करण्यात येईल.
