
नामदेव निर्मळे/ टाकळीवाडी: तालुका शिरोळ येथील श्री सरस्वती हायस्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी नाट्यीकरण स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावला.
शनिवार दि. ९ / ९ / २०२३ जयसिंगपूरमध्ये तालुका स्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेसाठी 11 संघ सहभागी होते. यामध्ये श्री सरस्वती हायस्कूल, टाकळीवाडीला तृतीय क्रमांक मिळाला . सर्वत्र या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. यासाठी शालेय समितीचे चेअरमन, सदस्य, मुख्याध्यापक मा. श्री संजय तपासे सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन मिळाले.
