भर पावसातही कोल्हापुरात जनसंवाद पदयात्रेस प्रचंड प्रतिसाद !!

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अभूत पूर्व यशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील ही पदयात्रा आज कोल्हापूर शहरातून काढण्यात आली. या जनसंवाद पदयात्रेस लोकातून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी रॅलीचे नेतृत्व केले…. दुपारी आपटे नगर येथून जनसंवाद पदयात्रेची सुरुवात झाली सरसेनापती संताजी घोरपडे चौक संभाजीनगर स्टॅन्ड इंदिरा सागर हॉल नंदीवाले चौक लाड चौक बिन खांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी आर चौक मार्गे दसरा चौकात आली.

🤙 8080365706