
दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागत भाषणाने शनिवारी दोन दिवसीय G20 शिखर परिषदेला सुरुवात झाली. मात्र या परिषदेची विशेष बाब म्हणजे मंचावर पंतप्रधान मोदींच्या समोर लावलेल्या देशाच्या नावाच्या फलकावर इंडिया ऐवजी भारत असे लिहिले होते.
गेल्या काही दिवसांपासून देशात इंडिया ऐवजी भारत हे नाव बदलण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. जी-20 परिषदेसाठी पाठवलेल्या निमंत्रण पत्रात ‘भारताचे राष्ट्रपती’ असे लिहिले गेले आहे. त्यामुळे देशाचे नाव बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरही लोक याविषयी आपापले युक्तिवाद करत आहेत.विरोधी पक्षचा नाव बदलाला विरोधएवढेच नाही तर इंडियाऐवजी भारत असे नाव लिहिल्याबद्दल विरोधी पक्षांनी मोदी सरकारलाही धारेवर धरले. देशाचे नाव बदलून भारत असे करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांवर विरोधी पक्ष सातत्याने टीका करत आहेत. यावर काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, जेव्हापासून इंडिया नावाने विरोधी पक्षांची युती झाली तेव्हापासून त्यांचा पाया डळमळीत झाला आहे. हे लोक विरोधी आघाडीला इतके घाबरले आहेत की आता तुम्ही भारताचे नाव असे लिहित आहात.
