मुंबई : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने गुरुवार दि.०७/०९/२०२३ इ.रोजी ठाणे येथील शारदा संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडीना गोकुळने प्रायोजित केली होते. या कार्यक्रमस्थळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसो, गोकुळ दुध संघाचे चेअरमन अरूण डोंगळे यांनी भेट दिली तसेच चेंबूर येथील दहीहंडी कार्यक्रमास जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील व संचालकांनी भेट दिली. या सर्व मान्यवरांचा आयोजकामार्फत सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘गोकुळने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मुंबईच्या बाजारपेठेत आपले नाव केलेआहे.गोकुळ दुधाची चव मुंबई व ठाणे तसेच उपनगरातील ग्राहकांच्या पसंतीस पडली आहे. गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ हे गोविंदा पथकांना उर्जा देण्याचे काम करतात. भविष्यात गोकुळने दुधासमवेत गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ ही मुंबई व उपनगरामध्ये जास्तीत जास्त उपलब्ध करून द्यावेत.’दरम्यान चेंबूर येथील दहीहंडीच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राज ठाकरे यांच्या पत्नी सौ.शर्मिला ठाकरे यांनीही गोकुळ दूध आपणही घरी वापरत असून त्याची चव इतर दुधापेक्षा चांगली आहे असे सांगत गोकुळ दुधाचे कौतुक केले.
तसेच भविष्यात कोल्हापूरमध्ये आल्यावर गोकुळ दूध संघास भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.यावेळी बोलताना चेअरमन अरूण डोंगळे म्हणाले, ‘गोकुळचे आणि मुंबईच्या गोविंदा पथकाचे ऋणानुबंध हे फार जुने आहेत. गेली कित्येक वर्ष ‘गोकुळ’ दहीहंडी आयोजक मंडळाना सहकार्य करत असते. भविष्यात मंबई उपनगरातील दूध विक्री वाढेल या दृष्टीने प्रयत्नशील आहे.” याप्रसंगी डोंगळे यांनी गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दहीहंडी आयोजक मंडळानी व सर्व गोविंदा पथकांनी या विशेष सहकार्याबद्दल गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील सर्व संचालकांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसो, चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक प्रकाश शिंदे, दहीहंडीचे आयोजक कृष्णा पाटील,शाकीर पाटील (कोल्हापूर), वाशी शाखा व्यवस्थापक दयानंद पाटील आदी उपस्थित होते.