कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या यापूर्वी अपात्र ठरलेल्या 1346 सभासदांची मा. सुप्रिम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रादेशिक साखर सह संचालक, कोल्हापूर यांनी नव्याने सुनावणी घेवून या अपात्र 1346 सभासदांपैकी 1272 सभासदांना अपात्र केल्याचा आदेश नुकताच दिला असून हा आदेश आम्ही काल पत्रकार परिषद घेवून सर्व ऊस उत्पादक सभासद व जनतेचे माहितीसाठी प्रसिध्द केला आहे.
यावर कारखान्याचे विद्यमान चेअरमन यांनी या आदेशास मा. सहकार मंत्री यांचेकडे अपिल करुन स्थगिती घेणार असलेबाबत माध्यम प्रतिनिधींना कळवले आहे.
प्रादेशिक साखर सह संचालक, कोल्हापूर यांनी 1272 सभासद अपात्र केलेचा दिलेला आदेश हा पूर्ण कायदेशीर व नियमानुसार असलेने या आदेशावर मा. सहकार मंत्री महोदय यांचेकडून एकतर्फी स्थगिती आदेश होवू नये म्हणून आमच्या आघाडीच्या वतीने मा. सहकार मंत्री यांचेकडे कॅव्हेट दाखल करण्यात आलेले आहे.

