सांडपाण्याच्या विरोधात पाडळी बुद्रुक ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलनप्रयाग :चिखली वार्ताहर


करवीर तालुक्यातील पाडळी बुद्रुक ग्रामस्थांनी शेजारील वरणगे गावातून येणाऱ्या सांड पाण्याच्या प्रश्नावर वरणगे ग्रामपंचायत प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको करून आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. येथील प्रयाग ते पाडळी बुद्रुक गावाच्या रस्त्यावर आज सकाळी नऊ ते बारा असे सुमारे तीन तास वाहतूक अडवून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी करवीर चे नायब तहसीलदार विजय जाधव यांनी आंदोलनकर्त्यांना भेट देऊन समजत काढली आणि वास्तविक स्थिती जिल्हा प्रशासना पुढे मांडून योग्य आश्वासन देऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन त्यांनी स्वीकारले त्यानंतर आंदोलन स्थगित झाले.
वरणगे – पाडळी अशीच जोडून नावे वापरल्याशिवाय या दोन्ही गावाची ओळख पटत नाही तसे या दोन्ही गावाचे एकमेकांशी अनेक बाबी मध्ये “सख्य”ही आहे या दोन्ही गावांना विभागणारा फक्त एक रस्ताच आहे. रस्त्याच्या एका बाजूला पाडळीची घरे तर दुसऱ्या बाजूला वरणगेची घरे अशी स्थिती आहे. गेली अनेक वर्षे या दोन गावांमध्ये सांडपाण्याचा प्रश्न आणि वाद आहे. वरणगे गाव उंचावर आहे तर पाडळी बुद्रुक सखल भागात आहे. पूर्वीपासून वरणगे गावातील साधारण 20 टक्के वस्तीचे पाणी पाडळी बुद्रुक गावातील शिवारातून जात होते. सांडपाणी अत्यल्प असल्यामुळे पूर्वी याचा प्रश्न इतका गंभीर नव्हता मात्र कालांतराने वस्ती वाढल्यामुळे अलीकडे सांड पाण्याचे प्रमाण वाढले आहे. पाडळी चे सरपंच शिवाजी गायकवाड यांच्या मते सध्या वरणगे येथील 75 टक्के मैला मिश्रित सांडपाणी पाडळी बुद्रुक गावामध्ये येत असल्याने मुख्य गावातील दुकान गाळे, गावाचे भूषण असलेले ग्रामदैवत दत्तात्रय देवस्थान, ग्राम तळे आणि रस्त्यावर पसरत असल्याने रोगराई पसरत आहे शिवाय सुमारे 15 ते 20 एकर जमीन नापीक होत आहे. आमच्या या व्यथा जिल्हा अधिकाऱ्यांसमोर वेळोवेळी मांडून देखील आम्हाला न्याय मिळत नाही म्हणूनच आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या कार्यालयामध्ये या वादावर बैठकाही झाल्या मात्र पाडळी बुद्रुक ग्रामस्थांच्या मते त्यांना न्याय मिळालेला नाही. म्हणूनच येथील रस्त्याच्या दुतर्फा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या गटारीना ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. आमचा विरोध विकासाला नाही ज्या गटारी बांधण्यात येतात त्यातून वरणगे गावातील सांडपाणी सोडण्यात येते त्याला आमचा विरोध आहे असे मत ग्रामस्थांचे आहे.
राहुल रेखावार यांनी वस्तुस्थिती लक्षात न घेताच पाडळी ग्रामस्थांना सांडपाणी अडवू नका म्हणून सज्जड दम दिला असल्याचे मत पाडळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आहे म्हणूनच आज आंदोलनात जिल्हाधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.
जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय एकतर्फी
यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
एकतर्फी असल्याचे सांगत घोषणा देऊन तीव्र संताप व्यक्त केला
दरम्यान या प्रश्नाचा तोडगा लवकरात लवकर निघाला नाही तर आम्ही सर्व ग्रामपंचायत प्रशासन धरणे आंदोलन उपोषण यासारखे तीव्र आंदोलन करून प्रसंगी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी एकत्रित राजीनामा देऊ असा इशाराही लोकनियुक्त सरपंच शिवाजी गायकवाड यांनी यावेळी दिला
जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय एकतर्फीच …..
यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या प्रश्नाबाबत एकतर्फीच निर्णय दिला असल्याचे सांगत घोषणा देऊन त्यांच्या निर्णयाचा तीव्र निषेध यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला
आमचे पाणी वीस-पंचवीस टक्केच
दरम्यान वरणगेचे सरपंच युवराज शिंदे यांना या प्रश्नाबाबत विचारले असता आमच्या गावामध्ये निर्माण होणाऱ्या एकूण सांडपाण्याच्या वीस ते पंचवीस टक्केच पाणी पूर्वीप्रमाणेच पाडळी बुद्रुक गावाकडे जाते. हे पाणी 75 टक्के म्हणणे चुकीचे आहे
या आंदोलनामध्ये पाडळी बुद्रुक गावचे सरपंच उपसरपंचांसह सदस्य तसेच विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी ग्रामस्थ सहभागी झाले होते

🤙 8080365706