कोल्हापूर : जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कोल्हापूर महानगरची जिल्हा कार्यकारणी आज घोषित करण्यात आली.
भाजपा कोल्हापूर महानगरच्या सरचिटणीस पदी विजय सूर्यवंशी, संजय सावंत, डॉ सदानंद राजवर्धन, गायत्री राऊत यांची निवड करण्यात आली, तसेच उपाध्यक्ष पदी अशोक देसाई, हेमंत आराध्ये, अजिंक्य चव्हाण, अजित ठाणेकर, आप्पा लाड, राजू मोरे, विराज चिखलीकर, उमा इंगळे, माधुरी नकाते, धनश्री तोडकर यांची निवड करण्यात आली आहे. चिटणीस पदी विजयसिंह खाडे-पाटील, भरत काळे, संतोष भिवटे, अतुल चव्हाण, रशीद बारगीर, रोहित पवार, जयराजसिंह निंबाळकर, स्मिता माने, संगीता खाडे, मंगला निपाणीकर, कोषाध्यक्ष पदी राजसिंह शेळके यांची निवड करण्यात आली.
त्याचबरोबर भाजपा कोल्हापूर महानगरमध्ये सात मंडल येतात. या सात मंडल अध्यक्ष यांची सुद्धा नियुक्ती आज करण्यात आली आहे. कसबा बावडा मंडल अध्यक्ष पदी प्रदीप उलपे, शाहूपुरी मंडल अध्यक्ष सुनीलसिंह चव्हाण, लक्ष्मीपुरी मंडल अध्यक्ष विशाल शिराळकर, राजारामपुरी मंडल अध्यक्ष अभिजित शिंदे, मंगळवार पेठ मंडल अध्यक्ष सुधीर देसाई, शिवाजी पेठ मंडल अध्यक्ष प्रकाश सरनाईक, उत्तरेश्वर पेठ मंडल अध्यक्ष सतीश घरपणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला मोर्चा अध्यक्षा पदी रूपाराणी निकम, युवा मोर्चा अध्यक्ष गिरीष साळोखे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष अनिल कामत, ओबीसी मोर्चा अध्यक्ष संतोष माळी, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष आजम जमादार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.