नेताजी पालकर युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी….

कोल्हापूर : कोल्हापुरात उत्साही आणि जल्लोषी वातावरणात चित्तथरारक मानवी मनोरे रचून धनंजय महाडिक युवाशक्तीची युवाशक्ती दहीहंडी संपन्न झाली. यावेळी मानाची दहीहंडी फोडून गडहिंग्लज येथील नेताजी पालकर व्यायामशाळा गोविंदा पथक सात थरांचा मानवी मनोरा रचत यंदाच्या तीन लाखाच्या बक्षिसाचे मानकरी ठरले.

खा. धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सायंकाळी युवाशक्ती दहीहंडी चे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेस सुरुवात झाली. दुपारी चार वाजल्यापासून दसरा चौकात नागरिकांची वर्दळ सुरू झाली. सायंकाळी सातनंतर चौक आबद्धांच्या गर्दन फुलून गेला. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.