शाहूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

कागलः श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास सन २०२२- २३ चा देश पातळीवरील को-जनरेशन असोशिएशन ऑफ इंडिया या नामांकीत संस्थेचा बेस्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्टसाठीचा देश पातळीवरील पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी जाहीर झाला आहे.

या पुरस्काराची निवड को आप सेक्टरमध्ये 87 किलो पर सेंटीमीटर स्क्वेअर बाॕयलर प्रेशरपेक्षा कमी बाॕयलर प्रेशर या विभागात झाली आहे. सन 2021-22 साली वरील संस्थेने *शाहू* ” कारखान्यास बेस्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट पुरस्काराने सन्मानित केले होते.कारखान्यास मिळालेला हा ६८वा पुरस्कार आहे.

यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील २५ तर राज्य पातळीवरील ४३ पुरस्कारांचा समावेश आहे. को – जन असोसिएशनचे डायरेक्टर जनरल मा.संजय खताळ यांनी पुरस्कार निवडीचे पत्र कारखान्यास पाठवून कारखान्याचे अभिनंदन केले आहे. दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी पुणे येथे को-जन असोसिएशन ऑफ इंडिया चे चेअरमन व माजी केंद्रीय कृषी मंत्री व विद्यमान राज्यसभा खा. शरदचंद्रजी पवार याचे हस्ते दिमाखदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होईल.

याबाबत प्रतिक्रिया देताना शाहू ग्रुपचे अध्यक्षराजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,हा तर शाहूच्या सभासद, शेतकऱ्यांचाच सन्मान असून, छत्रपती शाहू महाराज यांचे आशीर्वाद व कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे,समोर ठेवूनच कारखाना व्यवस्थापन आणि प्रशासन कार्यरत असलेने पुरस्कारातील सातत्य टिकून आहे.

अध्यक्षा, श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

सभासद ,शेतकरी यांनी विश्‍वासाने व प्रामाणिकपणाने दिलेली साथ, आणि व्यवस्थापनाचे नियोजनास अधिकारी- कर्मचारी यांच्या कष्टाची जोड याचा परिपाक आहे.या पुरस्काराचे खरे मानकरी सभासद शेतकरी असून ख-या अर्थाने त्यांचाच हा सन्मान आहे.कारखान्याचे संस्थापक स्व. राजेसाहेब यांच्या अमृत महोत्सवी जयंतीच्या निमित्ताने मिळालेल्या ६८ व्या पुरस्कारमुळे स्व.राजेसाहेबांना प्रत्यक्ष कृतीतूनच हे अभिवादन आहे.

🤙 8080365706