*तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांच्या २७ व्या स्मृतीदिना निमित्त माँसाहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. करवीर तालुका शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने गांधीनगर बाजारपेठ येथे माँसाहेब सौ.मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.*
*यावेळी "अमर रहे अमर रहे माँसाहेब अमर रहे" या घोषवाक्यांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.*
*यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, ग्राहक सेना तालुकाप्रमुख जितू कुबडे, विभागप्रमुख दिपक पोपटाणी, गांधीनगर व्यापारी रिटेल अध्यक्ष दिलीप कुकरेजा, शाखाप्रमुख दिपक अंकल, उपशाखाप्रमुख सुनील पारपाणी, किशोर कामरा, महेश सचदेव,शँकर गजवाणी, अजित चव्हाण, परमानंद बढेजा, सनी सुखवाणी आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.*