महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च होतो. ही समाधानाची बाब: बच्चू कडू

धुळे : देशात दिव्यांगांसाठी कायदा तयार करण्यात आला. पण या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने मला महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलने करावी लागली. त्यामुळे ३५० गुन्हे माझ्यावर दाखल झाले.यातील काही गुन्ह्यांमध्ये शिक्षा देखील झाली. पण दिव्यांगांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी आपण काम सुरूच ठेवले. आज महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च होतो. ही समाधानाची बाब आहे. देशातील अन्य राज्यात हा निधी खर्च होतच नसल्याची खंत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहामध्ये आज शासनाच्या दिव्यांग मंत्रालयाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात दिव्यांग व्यक्तींच्या नोंदणी पासून त्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर प्रतिभाताई चौधरी या होत्या. तर जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, अध्यक्षा अश्विनी पाटील, सभापती संजीवनी सिसोदे, उपसभापती देवेंद्र पाटील, महापालिकेच्या आयुक्त अनिता दगडे पाटील, सभापती कैलास पावरा, माजी सभापती अरविंद जाधव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

🤙 9921334545