उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यामुळेच राजे बँकेने केला मराठा समाजासाठी शंभर कोटी कर्ज वाटपाचा टप्पा पूर्ण …..

कागल : येथील राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँकेमार्फत आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेअंतर्गत मराठा समाजातील तरुणांना उच्चांकी 100/-(शंभर कोटी) रुपयांहून अधिक रकमेचा कर्जपुरवठा करून राज्यातील शेड्यूल्ड व नाॕन शेड्यूल्ड 348 बँकांमध्ये राजे बँक पहिली सहकारी बँक ठरली आहे. याचे सर्व श्रेय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना जातेत्यांच्यामुळेच हा यशस्वी टप्पा आम्ही पूर्ण करू शकलो, असे मत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुप चे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे,राजे बँकेने वरील योजने अंतर्गत शंभर कोटीहून अधिक रुपयाचा कर्ज पुरवठा मराठा समाजासाठी केलेला आहे. याबद्दल बँकेचे व्यवस्थापन आणि प्रशासनाचे मी मनापासून अभिनंदन करतो. तसेच याचे श्रेय त्यांनी आम्हाला दिलेले आहे, परंतु हे श्रेय आमचे नसून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते.यावेळी त्यावेळचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील याचे ही सहकार्य लाभले आहे असे स्पष्ट करताना ते म्हणतात, 2018 साली युती शासनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे हित लक्षात घेऊन त्यांनी केवळ मराठा समाजासाठी ही योजना आणली. राज्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज परतावा योजनेतून मराठा समाजाच्या 66 हजार 587 लाभार्थ्यांना 4850 कोटी रुपये कर्ज मंजूर केले असून त्याचा व्याज परतावा चालू आहे.आमच्याही सामाजिक वाटचालीत मराठा समाज ” *केंद्रस्थानी “* असलेने , मराठा समाजातील तरुणांना उद्योग व्यवसायात आणण्यासाठी आम्ही ही योजना प्रभावीपणे राबवली. या योजनेअंतर्गत 1168 तरुणांना उद्योग व्यवसायात आणून रुपये 100 कोटीहून अधिक व्यवसाय कर्ज वाटप केले. त्यांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य बँकेच्या माध्यमातून आम्ही केले असले तरी.मा.देवेंद्र फडणवीस साहेबांनी केवळ मराठा समाजासाठी ही योजना आणलेमुळेच हे शक्य झाले आहे. तसेच छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती योजनेत सन 2018- 19 मध्ये 10 हजार 224 मराठी विद्यार्थ्यांना 90 कोटी रुपये 19 -20 मध्ये 12,907 विद्यार्थ्यांना 118 कोटी रुपये व सन 20 -21 मध्ये 15 हजार 890 विद्यार्थ्यांना 149 कोटी रुपये तर सन 21-22 मध्ये 19 हजार नऊ विद्यार्थ्यांना 141 कोटी रुपयाची आर्थिक मदत सरकारने केली आहे. तसेच सारथी संस्थेद्वारे राष्ट्रीय अधिछात्रवर्ती योजना राबवून यूपीएससीमध्ये 51 व एमपीएससी मध्ये ३०४ उमेदवार भरण्यात यश मिळाले असून एकूण 2109 विद्यार्थ्यांना 87 कोटी रुपये शिष्यवृत्ती राज्य शासनाने वितरित केली आहे. याव्यतिरिक्त महाराणी ताराबाई स्पर्धा परीक्षा योजनेमध्ये ११,३९३ विद्यार्थ्यांना 45 कोटी रुपये आर्थिक मदत दिली आहे. सारथी उपकेंद्र कोल्हापूरला 176.38 कोटी चा निधी मंजूर केला आहे.अशी अनेक भरीव कामे देवेंद्र फडवणीस साहेब यांनी मराठा समाजासाठी केलेली आहेत.असेही पत्रकात म्हटले आहे.

🤙 9921334545